मी आणि माझे ध्येय

२४१, तुळजापूर विधानसभा मतदारसंघ
आपल्या तुळजापूर तालुक्याला हा खुप बलाढ्या असा ऐतिहासिक आणि आध्यत्मिक असा प्रगल्भ वारसा लाभला आहे. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि थोर समाज सुधारकांच्या वैचारिक वारशाने समृद्ध अशा या भूमित माझा जन्म झाला हे मी माझे भाग्य समझतो. 
 
तुळजापूर हे माझी जन्मभूमी, तुळजापूर हे माझी कर्मभूमी
 
तुळजापूर तालुक्याचा सामाजिक, भौतिक आणि आर्थिक विकास, हेच अंतिम ध्येय…
वर्षों नि वर्षे प्रलंबित असणारे अनेक तालुक्याचे प्रश्न सोडविण्याचे उधिष्ठ… 
माझी लढाई ही तालुक्यातील आणि तालुक्या बाहेरील प्रस्थापित नेते मंडळीं बरोबर आहे. वर्षों नि वर्षे तुळजापूर तालुक्याचे नेतृत्व करत असताना या नेतेमंडळींनी स्वत:चा विकास पुरेपुर केला मात्र तालुक्याच्या विकासला खीळ ठोकली… 
 
तालुक्यातील शेतकऱ्यांचे , तरुण पीढ़िचे आणि माता भगिनींच्या अनेक प्रश्ननांन कड़े जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि त्यांना नशिबाच्या भरोसे सोडले…आणि त्यांचा भविष्या बद्दलचा आशावाद संपवला…
मी योगेश केदार, तुमच्या मधील एक सर्व सामान्य शेतकरी कुटुंबतील एक सामान्या भूमीपुत्र…
वडीलांनी सोलापुर मार्केट यार्डात हमाली करून आणि आईने दुसऱ्याच्या शेतात रोजनदारी करून माझा आणि माझ्या भावंडांचा संभाळ केला.
 
गरीबी काय असते हे मला सांगायचे कारण नाही ती आम्ही भोगली आहे. सर्व सामान्य जनतेचे प्रश्न काय आहेत त्यांचे गंभीर्य काय असते हे हि मी जानतो…
मी माझ्या तालुक्यातील मतदार बंधु आणि भगिनींना एक गोष्ट मात्र पोट तिड़कीने सांगतो की माझा प्रत्येक श्वास आणि प्रयत्न हा तुमच्या आणि तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी असेल यात काहीच वाद नाही…
तुमचा योगेश केदार…
 
” माझी साद ही तुळजापूर तालुक्यातील सामान्य जनतेला आहे…
कारण माझे आह्व्हान हे तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील प्रस्थापित बलाढ्या नेत्यांना आहे…”
 
 

 

मी तुमचा योगेश केदार, एक मोहिम सुरु करत आहे… गाव एक, प्रश्न अनेक 
यात माझ्या मतदार बंधु आणि भगिनींना एक निवेदन आहे की त्यांनी आपल्या गावातील प्रश्नांना वाचा फोडावी…

तुळजापूर तालुक्यतील मतदार बंधु आणि भगिनींचे विविध प्रश्नांचा मंच