गाव एक, प्रश्न अनेक
२४१, तुळजापूर विधानसभा मतदारसंघ …
आपल्या तुळजापूर तालुक्याला हा खुप बलाढ्या असा ऐतिहासिक आणि आध्यत्मिक असा प्रगल्भ वारसा लाभला आहे. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि थोर समाज सुधारकांच्या वैचारिक वारशाने समृद्ध अशा या भूमित माझा जन्म झाला हे मी माझे भाग्य समझतो.
तुळजापूर ही माझी जन्मभूमी … तुळजापूर ही माझी कर्मभूमी …
तुळजापूर तालुक्याचा सामाजिक, भौतिक आणि आर्थिक विकास, हेच अंतिम ध्येय…
मी योगेश केदार, एक मोहिम सुरु करत आहे… गाव एक, प्रश्न अनेक
यात माझ्या मतदार बंधु आणि भगिनींना एक निवेदन आहे की त्यांनी आपल्या गावातील प्रश्नांना वाचा फोडावी…
माझी साद ही तुळजापूर तालुक्यातील सामान्य जनतेला आहे…
कारण माझे आह्व्हान हे तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील प्रस्थापित बलाढ्या नेत्यांना आहे…